
कॅनव्हासकर हुबेहूब रेखाटलेली चित्रे आपण पहातो. पण एका चित्रकार महिलेने ब्रेडच्या स्लाईसकर चित्र रेखाटले आहे. ब्रेडचा स्लाईस आणि बटाटय़ाचा वापर करून हे चित्र तयार केले आहे. मूळची रत्नागिरीची आणि सध्या कोल्हापुरात स्थायिक असलेली कविता कुलकर्णी-बंकापुरे हिने हे चित्र रेखाटले आहे.
कॅनक्हासकर अनेक चित्र रेखाटल्यानंतर तिने असा पहिलाच प्रयत्न केला आहे. बटाटय़ाचा कीस करून त्यात रंग मिसळून तिने हे फुलाचे चित्र रेखाटले आहे. कविता कुलकर्णी-बंकापुरे हिच्या चित्रांचे प्रदर्शन अनेक ठिकाणी भरविण्यात आले होते. तिच्या चित्रांना देशविदेशातून मागणी आहे.































































