
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानने ‘आकाश-1एस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेणाऱ्या या क्षेपणास्त्रामुळे लष्कराला बळकटी मिळाली आहे. गेल्या दोन दिवसातील ही दुसरी यशस्वी चाचणी आहे. आकाश क्षेपणास्त्रामध्ये हिंदुस्थानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती डीआरडीओने केली आहे.
आकाश क्षेपणास्त्र हे शत्रू राष्ट्राचे फायटर जेट्स, ड्रोन, क्रूझ क्षेपणास्त्र आणि हवेतून जमिनीवर हल्ला करणारे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करू शकते. ब्रह्मोसप्रमाणेच हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. याचा वेग 2.5 मॅक अर्थात 3,087 किलोमीटर प्रतितास एवढा आहे. 25-30 किलोमीटरपर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याचा अचूक वेध हे क्षेपणास्त्र घेऊ शकते. तसेच आकाश क्षेपणास्त्र आपल्यासोबत 60 किलो वजनाचे विस्फोटक सोबत घेऊन जाण्यास सक्षम आहे. तसेच कोणत्याही वातावरणामध्ये हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 2017 मध्ये ओडिशाच्या चांदीपूर येथे करण्यात आली होती.
DRDO today successfully test fired the Akash-1S surface to air defence missile system. This is the second successful test of the missile in last two days. This is a new version of the missile fitted with an indigenous seeker. pic.twitter.com/KK6Ig8XoK7
— ANI (@ANI) May 27, 2019
























































