गाजराचा रस प्या.. सुंदर आणि निरोगी दिसा.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थंडी सुरु झाली आहे. छान रसरशीत गाजरे बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. गाजराचे अनेक छान पदार्थ केले जातात. गाजर हलवा, गाजर पराठा, गाजराचा केक, सूप आणि बरेच काही.. पण यात गाजराचा रस सगळ्यात आरोग्यदायी ठरतो. गाजर खावून तुम्ही तुमचं वजन नियंत्रित करु शकतात. गाजर खाण्याचे तसे अनेक फायदे आहेत. गाजर खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अनावश्यक चरबी जमा होत असेल तर ती कमी होण्यास मदत होते. गाजरामध्ये अ ब, क, जीवनसत्त्वे , झिंक, लोह यासह अनेक पोषक घटक असतात.

गाजरच्या रसाचे फायदे

1) गाजरचा रस अ जीवनसत्वाचा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे त्वचेवर चमकदार होते . गाजरचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग निघून जातात. डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.

2) गाजराचा रस शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करतो. अॅनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी गाजराचा रस फायदेशीर आहे आणि याच्या सेवनाने शरीरात रक्त लवकर तयार होते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येत आराम मिळतो.

3) गाजराच्या रसात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. हे तुम्हाला तणाव आणि चिंतामुक्त ठेवते. वाढत्या नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. गाजराचा रस साखर आणि काळी मिरी मिसळून प्यायल्याने कफचा त्रास कमी होतो.