नवदाम्पत्याला हनिमूनला पाठवून ड्रग्ज प्रकरणात लटकवणाऱ्या दोघांना अटक

फुकटात हनिमून पँकेज देऊन नातेवाईक असलेल्या दाम्पत्याला ड्रग्ज प्रकरणात अडकविणार्या दोघांना नागपाडा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. आता नागपाडा पोलिस नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सोबत याप्रकरणाचा तपास करणार आहेत.

तब्बसुम रियाज पुरेशी आणि निझाम कारा ऊर्फ निझामुद्दीन मुसा कारा असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी गेल्या डिसेंबर महिन्यात एका नवविवाहित दाम्पत्याला कतारचे हनिमुन पॅकेज फुकटात दिले होते. शिवाय हनिमुनला जाण्यासाठी सामानाकरिता बॅग देखील दिल्या होत्या.

ठरल्याप्रमाणे ते दाम्पत्य कतारला गेल्यावर त्यांना चरसची तस्करी केल्याप्रकरणी पकडण्यात आले. कारण आरोपींनी दिलेल्या बँगेत तब्बल चार किलो चरस साठा लपवून ठेवलेला होता. परिणामी हनिमुन करखयला गेलेल्या त्या नवदाम्पत्याला तुरुंगात जावे लागले.

त्यानंतर त्या दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार तपास करून पोलिसांनी तपास करुन तब्बसुम आणि निझाम या दोघांना पकडले. नागपाडा पोलिस एनसीबीसह या गुह्याचा तपास करणार असल्याचे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या