ड्रग्स माफिया ललित पाटील येरवडा कारागृहात फक्त कागदोपत्री? मॉलमध्ये खरेदी, मैत्रिणीच्या गळ्यातगळे… फोटोतून धक्कादायक माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
lalit-patil

ड्रग्स माफिया ललित पाटील याचं ससून मधून पळून जाण्याच्या प्रकरणानं पोलीस, प्रशासन आणि सत्ताधारी सारेच अडचणीत आले आहेत. पालकांच्या मनात एकप्रकाराची भिती निर्माण झाली असूनविरोधी पक्षांनी हा मुद्दा उचून धरला आहे. अशातच आता ललित पाटीलचे फोटो एका खासगी वृत्तवाहिनीच्या हाती लागले आहेत, ज्यामध्ये येरवडा कारागृहात असताना देखील तो मैत्रिणीसोबत किंवा सिगारेट ओढताना दिसत आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 2020 मध्ये ललित पाटील याला येरवडा तुरुंगात टाकण्यात आलं होतं. मात्र या दरम्यान तो मोकळा वावरताना दिसत आहे. ससूनमध्ये सिगारेट ओढतानाचे त्याचे काही फोटो आहेत. तर काही फोटोंमध्ये तो पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये तर मॉलमध्ये खरेदी करतानाचेही फोटो आहेत. त्यामुळे तो कागदोपत्रीच तुरुंगात होता का? असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

दरम्यान, पोलिसांनी मकोका कायद्यानुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.