महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराची सुरक्षा वाढवली?

6370

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते, महानायक अमिताभ बच्चन यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे कळते आहे. अमिताभ यांच्या पत्नी आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी सध्या सुरू असलेल्या ड्रगच्या चर्चेवरून बॉलीवूडची बाजू मांडत भाजप खासदार रवि किशन यांच्यावर तोफ डागली होती. त्यानंतर अभिनेत्री कंगणा राणावत हिने बच्चन कुटुंबीयांना देखील ट्विटर वरून लक्ष्य केले होते. या साऱ्या प्रकरणानंतर बच्चन यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे कळते आहे. एनडीटीव्ही खबर या हिंदी वृत्तवाहिनीच्या संकेत स्थळावर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सामना अग्रलेख – झांजा आणि चिपळ्या; जया बच्चन यांची वेदना!

आपली प्रतिक्रिया द्या