दुबई – इटलीहून नगरमध्ये परतलेल्या त्या चार जणांवर देखरेख, प्रशासन सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो- प्रातिनिधीक

देशभरामध्ये कोरोना व्हायरस (corona virus) विषय सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नगर शहरामधून जे लोक बाहेरगावी सहलीला गेले होते त्यातील चार जण नगर येथे दाखल झाले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून देखरेख केली जात आहे. तर इटलीहून आलेल्या दोघांवरही पालिका प्रशासन नजर ठेवून आहे.

दरम्यान या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.’सहली वरून परतलेल्या व्यक्तींवर आम्ही निगराणी ठेवत असून त्यांना कुठेही बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे, असे डॉक्टर अनिल बोरगे यांनी सांगितले.

काहीजण दुबईमध्ये गेले होते तर काहीजण शिक्षणासाठी सुद्धा बाहेर देशांमध्ये गेलेले आहेत. त्यांच्या पालकांची आता कुटुंबाची चिंता वाढत चाललेली आहे. त्यातच नगर येथे इटलीतून तरुण दोन दिवसांपूर्वी एक विद्यार्थी नगरमध्ये दाखल झाला असून त्याची माहिती प्रशासनाने घेतली आहे. मात्र त्यांनाही सुद्धा घराबाहेर न पडण्याचा सल्ला यावेळी देण्यात आलेला आहे. नामांकित अशा एका ट्रॅव्हल्स कंपनीकडून 40 जण हे दुबई येथे फिरण्यासाठीच गेले होते संबंधित ट्रॅव्हल्स चालकांनी त्यांची सहल पूर्ण झाल्यानंतर साधरण एक तारखे रोजी हे सर्वजण पुणे येथे दाखल झालेले होते.

पुणे येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती. यामध्ये नगर शहरातील चार जणांचा समावेश होता, या चार जणांच्या संदर्भामध्ये प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांच्या निगराणीखाली एक पालिकेचे पथक तपासणीसाठी गेले होते. त्यांनी त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नका व तात्काळ काही असल्यास प्रशासनाची संपर्क करा असे सांगितले होते. जे कुटुंब फिरण्यासाठी गेले होते त्यांच्या मुली सुद्धा आता शाळेमध्ये जात नाहीये. त्या कुटुंबाने जरी काळजी घेतली असली तरी दुसरीकडे मात्र प्रशासनाने आता त्यांच्या संपर्कात कोण कोण आले कोण आहे त्यांची सुद्धा खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे.