
खरेदीसाठी बाहेर पडल्यानंतर कॉलेट किंवा एटीएम कार्ड घरीच विसरल्यावर चांगली पंचाईत होते. परंतु आता तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही. कारण आता तुम्हाला तुमच्या नखांद्वारे पैसे देता येणार आहेत. हो… हे अगदी खरंय. दुबईतील एक ब्युटी सलून लोकांच्या नखांमध्ये हे मायक्रोचीपिंग लावून देत आहे. हे मायक्रोचीपिंग आपल्याला डिजिटल कार्ड, शॉपिंग कार्ड आणि इन्स्टाग्रामवर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. नखांवरील मायक्रोचीप नियर फिल्ड कम्युनिकेशनवर कार्य करते. सलूनचे मॅनेजर नूर म्हणाले की, मुळात यासाठी आमच्यासमोर मोठे आव्हान होते की, नखात बसण्याइतकी लहान चीप कशी तयार करावा यावर लॉकडाऊनमधील निवांत वेळेत खूप रिसर्च केला. आतापर्यंत त्यांनी 500हून अधिक मायक्रोचीप मॅनिक्युअर म्हणजेच या चीपला नखांमध्ये बसवून घेतले आहे. भविष्यात नेल मायक्रोचीप कॉण्टॅक्टलेस पेमेंटसाठी वापरता येऊ शकते, असेही नूर यांनी सांगितले.

























































