देबांचे ‘ज्ञान’दान सुरुच, म्हणे बदकांमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । आगरतळा

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी पुन्हा आपले ज्ञान सर्वांसमोर उघड केले आहे. राज्यात ग्रामीण भागात बदकांचे वाटप करणार असल्याचे देब यांनी म्हटले आहे. बदक ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मजबुती देईल. बदकांमुळे पाण्यातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते असा दावा देब यांनी केला आहे.

चुकीच्या इतिहासाचे जनक बिप्लब देव कुमार यांचा नवा शोध

रुद्रसागर या कृत्रीम तळ्यात पारंपारिक बोट रेसचे उद्घाटन मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तळ्याजवळ राहणाऱ्या मच्छीमारांना 50 हजार बदक वितरीत करण्याची योजना आम्ही आखत आहोत. नैसर्गिक सौदर्य आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे बळकटी मिळेल, असे ते म्हणाले. तसेच बदक वितरणाचे फायदे सांगताना ते म्हणाले की, बदक पाण्यात पोहतात तेव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजनचे रिसायकलिंग होते. यामुळे मांशांना जास्त ऑक्सिजन मिळतो. तसेच बदकांच्या मलमुत्राचा देखील फायदा होतो. यामुळे मासेपालन आणि माशांची वाढ वेगाने होईल, असेही ते म्हणाले.

बिप्लव देवांचे उलटापुलटा सुरूच, रवींद्रनाथ टागोर यांनी ‘नोबेल’ परत केले होते

‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की प्रत्येक परिवाराला चार ते पाच बदक पाळण्यासाठी देण्याची योजना आहे. बदक पालनामुळे कुटुंबातील मुलांना प्रोटिन आणि व्हिटॅमिन मिळेल. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या बदकांमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल या वक्तव्याला त्रिपुरा जुक्तीबाद विकास मंचचे मिहिर लाल रॉय यांनी बेजबाबदार वक्तव्य म्हटले आहे. मुख्यमंत्री कोणताही वैज्ञानिक आधार नसलेले वक्तव्य करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे रामायण, सीता ही टेस्टटय़ूब बेबी