
सामना ऑनलाईन, रत्नागिरी
कोकण किनारपट्टीवर आज समुद्राला प्रचंड उधाण आले असून या उधाणाचा तडाखा गणपतीपुळे किनाऱ्याला बसला आहे. गणपतीपुळे मंदिराच्या संरक्षक भिंतीचा कठडा तोडून समुद्राचे पाणी आत शिरले. आज दुपारनंतर समुद्राला पुन्हा उधाण आले. मिऱ्या पंधरामाड येथे आज पुन्हा लाटांनी थैमान घातले असून बंधाऱ्यांच्या दगडाबरोबर लाटांनी नारळबागाही गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. समुद्राला उधाण आले असून पालघर, मिर्या, मुंबई किनारपट्टीवर लाटांनी जोरदार धडक दिली आहे.






























































