खरीप पिके धोक्यात

73

सामना प्रतिनिधी। हडोळती

हडोळती व परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी संकटात सापडला असून यंदाचा खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. उन्हाची तीव्रता वाढून ३२ ते ३४ तापमानावर पोहचली आहे. यामुळे पिके कोमजून पिवळे पडू लागली आहेत.

हडोळती व परिसरात जूनच्या दुसऱ्या आठवडयामध्ये समाधानकारक पाऊस झाला. यामुळे पन्नास टक्केच्यावर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या. पेरणी केल्याने पिकाची उगवण चांगली झाली. परत पावसाने उघडीप दिली व जूनच्या तिसऱ्या आठवडयात उर्वरीत शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. पण पावसाच्या अधूनमधून पडणाऱ्या तुरळक पावसाने पिके तग धरली. पण अवेळी पडणाऱ्या पावसामुळे बहुतांश जणाना दुबार तिबार पेरणीला सामोरे जावे लागले आहे .
सोयाबीन शेंग भरण्याच्या मोसमात पंधरा दिवसा पासून पावसाने उघडीप दिल्याने व जमीनीत ओलावा नसल्याने पिके कोमजून पिवळे पडू लागली आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे .

शेतकऱ्यांना मोठया पावसाची प्रतिक्षा आहे . दडी मारुन बसलेल्या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आला असून जमीनीत ओलावा नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे .

आपली प्रतिक्रिया द्या