जम्मू कश्मीरमध्ये भूकंप, सुदैवाने जीवितहानी नाही

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरला गुरूवारी सकाळी भूकंपाने हादरा दिला. सकाळी 8 वाजून 22 मिनिटांनी हे भुकंपाचे धक्के जाणवले असून त्याची तीव्रता 4.6 रिश्टर इतकी होती. सुदैवाने या भुकंपात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

गेल्या दोन वर्षात जम्मू कश्मीर आणि उत्तर हिंदुस्थानमध्ये अनेक भूकंपाचे झटके बसले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये आज झालेल्या भुकंपाचा केंद्रबिंदू लेहपासून 63.6 कि.मी होता.    

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदुस्थानच्या हिमालय भागात लवकरच एक मोठा भूकंप येऊ शकतो. या भूकंपाची तीव्रता 8.5 असू शकते असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्त हानी होण्याचीही शंका त्यांनी व्यक्त केली. जर याबाबत वेळीच उपाययोजना नाही केली तर या भुकंपामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होण्याची भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.