सीमा अशांत, आठ महिन्यांत पाकड्यांनी केले3186 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

लडाख सीमेवर चीनच्या कुरापती सुरु असतानाच जम्मू-काश्मीर सीमेवरही अशांतता आहे.गेल्या आठ महिन्यात पाकड्यांनी तब्बल 3186 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या 17 वर्षात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या या सर्वाधिक घटना आहेत. यासंदर्भात राज्यसभेत प्रश्न विचारणात आला होता. सरकारच्यावतीने संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी उत्तर दिले.

आठ जवान शहीद

पाकड्यांनी 242 वेळा सीजफायर केले. या गोळीबाराला हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गेल्या आठ महिन्यात सीमेवर आठ जवान शहीद झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या