कुरुंद्यात मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन, धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक संतप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या घटनाक्रमास मुख्यंमत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार आहेत अशी भावना शिवसैनिकांत निर्माण झाली आहे. त्यातून आज वसमत तालुक्यातील कुरुंदा, पांगरा शिंदे येथील संतप्त शिवसैनिकांनी माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा सेना तालुका युवाधिकारी विजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गद्दारांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी पांगरा शिंदे येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख रमेश शिंदे, गजानन लेकुळे, सिरळी येथील भारत नलगे, कुपटीचे सरपंच यशवंत लेकुळे, युवा सेनेचे सर्कल युवाधिकारी बजरंग जांबूतकर, शिवाजी गायकवाड, प्रवीण पवार, नामदेव शिंदे, बालाजी शिंदे, दिलीप अण्णा, शिवणू अण्णा, बंडू नाना, पप्पू शिंदे, कल्याण शिंदे, विलास शिंदे, श्याम आखरे, अमोल जोशी, प्रवीण शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश आंबोरे, सुधाकर शिंदे, सोपान सोनटक्के, वैभव सोनटक्के, विशाल शिंदे, प्रथमेश शिंदे, दौलतराव शिंदे, चिंतामणी डुकरे, तुकाराम शिंदे, प्रभाकर शिंदे, राहुल शिंदे, महेश पतंगे, सोपानराव शिंदे, प्रताप शिंदे, बाबाराव शिंदे, संजय शिंदे, पुरभाजी शिंदे, राजू शिंदे, श्रीधर शिंदे यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.