ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगूल वाजले! 2359 ग्रामपंचायतींत 5 नोव्हेंबरला मतदान

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगूल अखेर वाजले आहे. जानेवारी 2023नंतर मुदत संपलेल्या आणि नव्याने तयार झालेल्या अशा एकूण राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायती तसेच 2 हजार 950 सदस्य पदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिकडणुकांसाठी 5 नोक्हेंबर रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निकडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी आज केली.

जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱया ग्रामपंचायती तसेच राज्यात नव्याने स्थापन झालेल्या आणि 2022मध्ये चुकीच्या प्रभाग रचनेमुळे निवडणुका होऊ न शकलेल्या राज्यातील 2 हजार 259 ग्रामपंचायतींमधील सदस्यांसह सरपंच पदाच्या थेट निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी केली. निवडणुका जाहीर झालेल्या सर्व ग्रामपंचायत क्षेत्रांत मंगळवार 3 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली असल्याचे आयुक्त मदान यांनी सांगितले.

असा आहे कार्यक्रम

अर्ज दाखल करण्याची तारीख-16 ते 20 ऑक्टोबर n उमेदवारी अर्जांची छाननी – 23 ऑक्टोबर n अर्ज मागे घेण्याची तारीख – 25 ऑक्टोबर दुपारी 3 काजेपर्यंत n मतदान – 5 नोक्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30
मतमोजणी – 6 नोक्हेंबर रोजी होईल