
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ आहे. 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश असणाऱ्या या मतदारसंघात 18 लाख 60 हजार 45 एवढे मतदार आहेत. तर 1963 एवढी मतदान केंद्रे असणार आहेत. 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होण्यासाठी प्रशासन विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला महापालिका आयुक्त एस.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांची उपस्थिती होती. लातूर लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिलला मतदान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघाचा आणि नांदेड जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेला लातूर लोकसभा मतदारसंघ आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात एकुण 18 लाख 60 हजार 45 मतदारांपैकी पुरुष मतदार 9 लाख 81 हजार 498 तर महिला मतदार 8 लाख 78 हजार 507 आहेत. हे मतदार 1963 मतदान केंद्रांवर मतदान करणार आहेत.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पुरुष मतदारांची संख्या 166728 महिला मतदारांची संख्या 149379 अशी एकूण 316108 मतदारसंख्या असून 355 मतदान केंद्राची संख्या आहे. एका तृत्तीयपंथीय मतदाराची नोंदणीही झाली आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात 190567 पुरुष मतदार 173790 महिला मतदार अशी एकूण 364357 मतदारांची संख्या आहे. 356 मतदान केंद्राची संख्या राहणार आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात 1678832 पुरुष मतदार तर 147339 महिला मतदारांची संख्या आहे. एकूण 315171 मतदार असून 355 मतदान केंद्राची संख्या आहे. उद्गीर विधानसभा मतदारसंघात 153628 पुरुष मतदारांची संख्या आहे तर 133607 महिला मतदार आहेत. एकुण मतदारसंख्या 287235 एवढी असून 315 मतदान केंद्राची संख्या राहणार आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात 162653 पुरुष मतदार, 144392 महिला मतदार अशी एकूण 307045 एवढी मतदारसंख्या आहे. 340 मतदान केंद्राची संख्या आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघात 140090 पुरुष मतदारसंख्या तर 130036 महिला मतदारसंख्या अशी एकूण 270129 मतदारसंख्या आहे. 312 मतदान केंद्र या विधानसभा क्षेत्रात राहणार आहेत.लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघाचा समावेश धाराशिव लोकसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघात 147455 पुरुष मतदार तर 129022 महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंख्या 276477 एवढी असून 304 मतदान केंद्राची संख्या आहे. 26 मार्चपर्यंत मतदारांना आपले नाव नोंदवता येणार आहे. त्यामुळे आवश्यकता वाटली तर मतदान केंद्रामध्ये वाढही करण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. लातूर लोकसभा मतदारसंघासाठी 4515 बीयू, 2580 सीयू आणि व्हीव्हीपॅट 2766 उपलबध करून देण्यात आले आहेत. ईव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर यावेळी प्रथमच करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान कर्मचारी 12384 नियुक्त करण्यात येणार आहेत. सुक्ष्म निरीक्षक 50, झोनल ऑफिसर 253, भरारी पथक 36, स्टॅटीक सव्र्हियलन्स टिम 27, व्हिडीओ सव्र्हियलन्स टिम 26 आणि व्हिडीओ व्हिव्हिंग टिम 10 राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कंट्रोलरुम तयार करण्यात आलेली आहे. त्याद्वारे ईव्हीएम मशिनला लावण्यात आलेल्या ट्रॅकिंग सिस्टीमवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 1950 हा टोलफ्री नंबर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, असेही जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले.
























































