
देशातील 13 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये तीन लोकसभा आणि 29 विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. रात्री उशिरापर्यंत त्यातील बहुतांश जागांचे निकाल हाती आले. या निवडणुकांच्या निकालांनी भाजपासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकऱयांचे आंदोलन झालेल्या हिमाचल प्रदेश आणि हरयाणामध्ये सत्ताधारी भाजपाला चांगलाच फटका बसला. कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपाची डाळ अपेक्षेइतकी शिजली नाही. भाजपला महागाई नडली हेच निकालाने स्पष्ट झाले आहे.



























































