
विधानसभा निवडणूक लागलेल्या पाच राज्यांतील कोरोना विस्फोटचा धोका अखेर खरा ठरला. दीड महिना चाललेल्या निवडणुकीमुळे पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत 500 टक्क्यांची वाढ झाली आहे. इतकेच नव्हे तर मृत्यूचे प्रमाणही सरासरी 45 टक्क्यांनी वाढले आहे.
पाच राज्यांतील 1 ते 14 एप्रिलपर्यंतच्या रुग्णवाढीने संपूर्ण देशाला धडकी भरवली आहे. 16 ते 31 मार्चपर्यंत आसाममध्ये 537, पश्चिम बंगालमध्ये 8062, पुद्दुचेरीत 1400, तामीळनाडूत 25,244 व केरळमध्ये 30,390 कोरोनाग्रस्त आढळले होते. मात्र गेल्या 14 दिवसांत आसाम-3398, पश्चिम बंगाल- 41927, पुद्दुचेरी- 3721, तामीळनाडू- 65458 अशी विक्रमी रुग्णवाढ झाली.
अशी झालीय रुग्णवाढ
- आसाम – 532 टक्के
- बंगाल – 420 टक्के
- पुद्दुचेरी – 165 टक्के
- तामीळनाडू – 159 टक्के
- केरळ – 103 टक्के

























































