राज्यात घुसलेल्या हत्तींचे होणार पुनर्वसन; सिंधुदुर्ग आणि विदर्भात होणार एलिफंट सफारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात ताडोबा, पेंचसारखी अभयारण्य टायगर सफारीसाठी जगप्रसिद्ध आहेत. आता टायगर सफारीच्या धर्तीवर कोकण आणि विदर्भात एलिफंट सफारीची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात पर्यटकांचा ओघ अधिक वाढेल असा विश्वास वन खात्याला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत हत्तींची संख्या वाढत आहे. गोंदिया-भंडारा येथील जंगलात 23 हत्ती तर सिंधुदुर्गात 8 हत्ती असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे हत्ती झारखंड व छत्तीसगडमधून महाराष्ट्रात आल्याचे सांगण्यात येते. राज्यात घुसलेले हे हत्ती शेतीचे प्रचंड नुकसान करतात. हत्तींचा कळप घुसला तर संपूर्ण शेती, केळीबागा फस्त करतात. हत्तींच्या हल्ल्यात काही ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या हत्तींना पिटाळण्यासाठी मध्यंतरी मोठी मोहीम राबवण्यात आली होती. त्यासाठी दुसऱया राज्यातून प्रशिक्षित हत्तीही आणले होते, पण या मोहिमेला फार यश मिळाले नाही. त्यामुळे राज्यात घुसलेल्या हत्तींचे पुनर्वसन करण्यासाठी दोन एलिफंट सफारी निर्माण करण्याची योजना आहे. त्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे.

राज्यात हत्तींची वाढती संख्या
देशात व राज्यात वाघांची गणना होते त्याच धर्तीवर 2017 मध्ये हत्तींची गणना झाली होती तेव्हा देशात सुमारे 29 हजार 964 हत्तींची नोंद झाली होती. अर्थात त्यानंतर आता हत्तींची संख्या वाढली आहे असे वनखात्यातील कर्मचारी सांगतात. तेव्हा महाराष्ट्रात फक्त 6 हत्ती होते असे सांगण्यात आले होते, पण सध्या राज्यातील जंगलात किमान 31 हत्ती असल्याचे सांगण्यात येते. शेजारच्या राज्यातून हे हत्ती खाद्याच्या शोधात राज्यात आले. राज्यात सिंधुदुर्ग व आसपासच्या जिह्यात पाणी व खाद्य मुबलक असल्याने हत्तींची संख्या वाढत आहे. देशात गेल्या काही वर्षांपासून हत्तींची संख्या कमी होत आहे. त्यामुळे पेंद्र सरकारने 1992 पासून प्रोजेक्ट टायगर राबवण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या 15 वर्षांत महाराष्ट्र व गोव्यात हत्तींची संख्या वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात अचानक हत्तींची संख्या वाढली. आसाम व झारखंडमधून हत्ती राज्यात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे हत्ती कोल्हापूरच्या आजरा-चंदगड पुढे खानापूर, कनपुंभी व जांबोटी आणि दोडामार्ग अशा मार्गाने वनक्षेत्रात आले. ऑक्टोबर 2022च्या आसपास हे हत्ती दोडामार्गातून सिंधुदुर्गात पोहोचले.