
जम्मू-कश्मीर येथील कालाकोट, राजौरी येथे सलग दुसऱया दिवशी सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. कालाकोटच्या टाटापानी भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याचा संशय असल्याने जम्मू पोलीस आणि केंद्रीय राथीव पोलीस दलाने लष्कराच्या मदतीने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. राजौरीत शोधमोहीम राबवली जात आहे.
या भागात लपलेल्या दहशतवाद्यांकडे मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्ते असू शकतात असाही पोलिसांचा अंदाज आहे. 1 ऑक्टोबर रोजी कालाकोटच्या ब्रोह आणि सूम जंगलात संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर तातडीची कार्यवाही हाती घेण्यात आल्याची माहिती जम्मू डीफेन्स पीआरओ लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी दिली. राजौरीतील कालाकोटे भागातील नाकेबंदी केलेल्या जंगल भागात सुरक्षा सैनिक आणि अतिरेक्यांमध्ये झालेल्या गोळीबारात दोन सैनिक जखमी झाले.