महादेव गेमिंग घोटाळ्या प्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरला ईडीचे समन्स

महादेव गेमिंग घोटाळ्यात प्रकरणी ईडीने अभिनेत्री श्रद्धा कपूरला समन्स बाजवले आहे. श्रद्धा सोबतच हुमा कुरैशी, कपिल शर्मा आणि हिना खान यांनाही समन्स बजावल्याचे समजते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

याप्रकरणी आतापर्यंत ईडीने गोविंदा, रणबीर कपूर यांनी ईडीने समन्स बजावले आहे. रणबीर कपूरसह अनेक सेलिब्रेटी महादेव ऑनलाइन गेमिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकर याच्या लग्नसोहळय़ात हजर होते. चंद्राकरवर हवालाच्या माध्यमातून कलाकारांना पैसे दिल्याचा आरोप आहे.

ईडी या प्रकरणात टायगर श्रॉफ, नुसरत भरुचा, सुखविंदर सिंह, नेहा कक्कर, सनी लियोनी, अतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, एली अबराम, भारती सिंह, भाग्यश्री, कृती खरबंदा, कृष्णा अभिषेक आणि सुखविंदर सिंह आदी  17 सेलिब्रिटींची चौकशी करू शकते.