इंग्लंडचा बांगलादेशवर 106 धावांनी विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | कार्डिफ

सलामीवीर जेसन रॉय ( 121 चेंडूंत 151) याचे धडाकेबाज दीड शतक आणि त्यानंतर बेन स्टोक्स (23 धावांत 3 विकेट ) आणि जोफ्रा आर्चर ( 29 धावांत 3 विकेट) यांच्या प्रभावी माऱयाच्या बळावर इंग्लंडने झुंजार बांगलादेशचा डाव 48.5 षटकांत 280 धावांत संपुष्टात आणला आणि इंग्लंडला 106 धावांनी शानदार विजय मिळवून दिला. शतकवीर रॉयला लढतीतील मॅन ऑफ दि मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बांगलादेशच्या अष्टपैलू शाकिब अल हसनने 121 धावांची झुंजार शतकी खेळी करीत यजमानांना विजयासाठी चांगलेच झुंजवले. पण मुशफिकर (44 ) वगळता बांगलादेशचे अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने यजमान इंग्लंडला मोठा विजय मिळवता आला.

अष्टपैलू शाकिब अल हसनच्या 119 चेंडूंतील 121 धावांच्या धडाकेबाज शतकी खेळीनंतरही बांगलादेशला यजमान इंग्लंडकडून 106  धावांनी पराभव पत्करावा लागला. शाकिबने यष्टीरक्षक मुशफिकर (50 चेंडूंत 44) याच्या साथीने तिसऱया विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी साकारत संघाचा पराभव टाळण्याचा निकराचा प्रयत्न केला. पण इंग्लंडच्या 386 धावांच्या डोंगरापुढे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. जोफ्रा आर्चर 29 धावांत 3 विकेट आणि बेन स्टोक्स 23 धावांत 3 विकेट यांनी बांगलादेशचे वळवळणारे शेपूट छाटत संघाला शानदार विजय मिळवून दिला.

 रॉय–बेयरस्टॉची शतकी भागी

तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडला दिलेला फलंदाजीचा निर्णय साफ अपयशी ठरला. जेसन रॉय व जॉनी बेयरस्टॉ (51) यांनी 19.1 षटकांत 128 धावांची सलामी देत इंग्लंडला खणखणीत सुरुवात करून दिली. बेयरस्टॉने 50 चेंडूंत 6 चौकार लगावले. जेसन रॉयने 121 चेंडूंच्या खेळीत 153 धावांची फटकेबाजी करताना 14 सणसणीत चौकारांसह 5 षटकारांचा घणाघात केला. त्यानंतर जोस बटलरने टॉप गिअरमध्ये फलंदाजी करताना 44 चेंडूंत 2 चौकार व 4 टोलेजंग षटकारांसह 64 धावांची वादळी खेळी केली. त्याने कर्णधार मॉर्गनच्या (35) साथीने 105 धावांची भागीदारी साकारली.

धावफलक

इंग्लंड: जेसन रॉय झे. मोर्तझा गो. मेहदी 153, जॉनी बेयरस्टॉ झे. मेहदी गो. मोर्तझा 51, जो रूट त्रि. गो. सैफुद्दीन 21, जोस बटलर झे. सरकार गो. सैफुद्दीन 64, इयान मॉर्गन झे. सरकार गो. मेहदी 35, बेन स्टोक्स झे. मोर्तझा गो. मुस्तफिझुर 6, ख्रिस वोक्स नाबाद 18, लियम प्लंकेट नाबाद 27. अवांतर: 11, एकूण:6 बाद 386 गोलंदाजी: शाकिब अल हसन 10-0-71-0, मशरफे मोर्तझा 10-0-68-1, मोहम्मद सैफुद्दीन 9-0-78-2, मेहदी हसन 10-0-67-2.

बांगलादेश : तमिम इक्बाल झे. मॉर्गन गो. वूड 19, शाकिब अल हसन त्रि. गो. स्टोक्स 121, मुशफिकर रहीम झे. रॉय गो. प्लंकेट 44, मेहमुदुल्लाह झे. बेयरस्टो. गो. वूड 28, मोसाददेक होसेन झे. आर्चर गो. स्टोक्स 26  अवांतर :18, एकूण : 48.5 षटकांत सर्वबाद 280, गोलंदाजी : ख्रिस वोक्स 8-067-0, जॉफ्रे आर्चर 8.5-2-29-3, लियाम प्लंकेट 8-0-36-1, मार्क वूड 8-0-52 -2, बेन स्टोक्स 6-1-23-3.