World Cup 2019 इंग्लंड, हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया नक्कीच बाद फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

 यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गतविजेता ऑस्ट्रेलिया, माजी विजेता हिंदुस्थान आणि यजमान इंग्लंड हे तीन संघ निश्चितच उपांत्य फेरीत पोचणार आहेत. चौथ्या क्रमांकासाठी मात्र न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान या तीन संघांत जोरदार चुरस लागणार आहे, असे मत हिंदुस्थानचा माजी अष्टपैलू खेळाडू आणि धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग याने व्यक्त केले आहे. युवराजच्या मते वेस्ट इंडीज आणि यजमान इंग्लंड संघ टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकणार आहेत. असे युवराज म्हणाला.