आधी कायद्याचे भय दाखवून उद्योजकांना त्रास दिला जायचा! पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधी कायद्याचे भय दाखवून उद्योजकांना त्रास दिला जात होता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. नऊ वर्षांपासून आम्ही ऐतिहासिक सुधारणा करीत असून जॉब क्लस्टर्सच्या पाठीशी उभे आहोत, असेही मोदी म्हणाले.

दाऊदी बोहरा समाजाच्या अल जामिया तुस सौफिया या संकुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. मी तुमच्या परिवाराचा सदस्य आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान असा उल्लेख करू नका. मी तुमच्या परिवारातील असून चार पिढय़ांपासून तुमच्यासोबत आहे, असे मोदी म्हणाले.

नाते प्रेमाचे

मोदी म्हणाले, माझे आणि दाऊदी बोहरा समाजाचे नाते जुने आणि प्रेमाचे आहे. कुपोषण, जलसंरक्षण अभियानापर्यंत समाज आणि सरकार कसे एकदुसऱ्याची शक्ती बनते याची मी अनुभूती घेतली आहे. मी जगात कुठेही गेलो तरी मला या समाजाचे प्रेमच मिळाले आहे, अशा शब्दांत मोदींनी दाऊदी बोहरा समाजाचे काwतुक केले.

सरकारी योजनांचा ताळेबंद

मोदींनी या वेळी सरकारी योजनांचाही ताळेबंद मांडला. देशात प्रत्येक आठवडय़ाला एक विद्यापीठ आणि दोन महाविद्यालये उघडली असून या गतीने हिंदुस्थान विश्वाला भविष्याची दिशा देणारे विद्यापीठ बनेल, असे मोदी म्हणाले. शिक्षण व्यवस्थेत स्थानिक भाषेला महत्त्व दिले जात आहे. स्थानिक भाषेतून तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मिळणार आहे, असेही ते म्हणाले.