कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे सदैव खुले – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमध्ये सुरू असलेल्या टार्गेट किलिंगबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. कश्मिरी पंडितांसाठी सर्वातोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. कश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे सदैव खुले असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सध्या कश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कश्मिरी पंडित कश्मीर खोऱ्यातून बाहेर पडत आहेत. ही स्थिती योग्य नाही. कश्मिरी पंडितांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची गरज आहे. सध्याच्या कश्मीरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचेही त्यांनी सांगितले.