
दिल्ली मेट्रो काही विचित्र घटनांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आधी बिकीनी घालून मेट्रोतून प्रवास करणारी तरुणी गर्ल, मेट्रोत आंघोळ करणारा तरुण अशा धक्कादायक घटनांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हायरल व्हिडीयोंच्या यादीत आणखी एका व्हिडीओची भर पडल्याचा दावा केला जात आहे. मेट्रो ट्रेन आणि फलाट याच्यात एकजण विचित्र पद्धतीने अडकला होता. या व्यक्तीचा आणि त्याला लोकं मदत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
अपघातादरम्यान एक प्रवासी रुळावरून खाली उतरून एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, मेट्रो आल्याने तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये विचित्र पद्धतीत अडकला. ट्रेन ऑपरेटरने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली आणि प्रवाशाला तेथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तरुणाला उपचारासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले.
दिल्ली मेट्रोच्या रेल कॉर्पोरेशनने म्हटले आहे की, या घटनेची चौकशी करताना नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले आहे.दिल्ली मेट्रोचे डीसीपी राम गोपाल नाईक यांनीही या प्रकरणाचा खुलासा केला असून हे वृत्त हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, या व्हिडीओशी संबंधीत अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ही खूप जुनी घटना असू शकते किंवा इतर कुठेतरी घडली असावी, परंतु अलीकडे दिल्लीत अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राम गोपाल यांनी या व्हायरल व्हिडीओबद्दल मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, मेट्रो असो किंवा रेल्वे नागरिकांनी नेहमीच सतर्क राहणे गरजेचे आहे. प्लॅटफॉर्म आणि मेट्रो ट्रेनमधील अंतरावर लक्ष न दिल्यास महागात पडू शकते. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.






















































