
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इथिओपियाहून नैरोबीला प्रवास करणारे इथिओपिअन एअर लाईन्स विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. मृ
Ethiopian Airlines: Four Indians among the 157 people who lost their lives after Addis Ababa-Nairobi flight crashed, earlier today. pic.twitter.com/EcU3YI6FTY
— ANI (@ANI) March 10, 2019
विमान अपघातात मृत पावलेल्या हिंदुस्थानीची नावे कळाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. वैद्य पंचगेस भास्कर, वैद्य हंसिन अन्नगेश, नुवरराव मनुनी आणि शिखा गर्ग अशी चौघा मृतांची नावे आहेत. या चौघांचेही मृतदेह मिळवण्यासाठी इथिओपियातील हिंदुस्थानी दूतावासाला निर्देश देण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी दिली.
External Affairs Minister Sushma Swaraj: Embassy of India in Ethiopia has informed me that the deceased Indian nationals are Vaidya Pannagesh Bhaskar, Vaidya Hansin Annagesh, Nukavarapu Manisha and Shikha Garg. https://t.co/h3NMr4xDP4
— ANI (@ANI) March 10, 2019
इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 हे विमान इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा ते केनियाची राजधानी नैरोबी असा प्रवास करत होतं. या विमानात 149 प्रवासी आणि आठ क्रू सदस्य प्रवास करत होते. रविवारी सकाळी 8.38 ला विमानाने उड्डाण केलं होतं. त्यानंतर 8.44 वाजता विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळाने ते कोसळलं.

























































