Women’s Day माझ्यासाठी रोजच महिला दिन – अभिनेत्री श्वेता शिंदे

माझ्यासाठी रोजच महिला दिवस आहे. महिला संसाराची गाडी अगदी हसतमुखाने पुढे नेत असतात. त्यामुळे रोजचा दिवस हा त्यांचाच असतो असं मी म्हणेन. माझी आई माझं प्रेरणास्रोत आहे. तिला बघून मला काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा सतत मिळत असते.

‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत मी डॉक्टर आणि कॉलेजच्या डीनची भूमिका निभावतेय. पण खऱया आयुष्यातील डॉक्टरची भूमिका किती आव्हानात्मक आहे हे आपण कोविडच्या काळात बघितलं आणि अजूनही बघतोय. त्यांचं योगदान हे वेगळं सांगायची गरज नाही. ते डॉक्टर नसून देव म्हणूनच सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यात अनेक महिला डॉक्टर्स आणि परिचारिका यांचा समावेश होता. त्या सर्वांकडून मला खूप प्रेरणा मिळाली.

आपली प्रतिक्रिया द्या