माजी नगरसेविकेच्या पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या

death

माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने  बुधवारी मध्यरात्री स्वतःच्या कार्यालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे सदाशिव पेठेमध्ये खळबळ उडाली आहे. जयंत रजपूत असे त्यांचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली, याचे कारण कळू शकलेले नाही.

जयंत रजपूत (रा. खजिना विहार, सदाशिव पेठ) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयंत यांचे लॉ कॉलेज रस्त्यावरील कांचन गल्लीत कार्यालय आहे. त्यांची बारामतीत औषध कंपनी आहे.  बुधवारी मध्यरात्री त्यांनी कार्यालयमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा कार्यालयमध्ये गेल्यानंतर वडील जयंत यांनी गळफास घेतल्याचे त्याला दिसून आले. त्यानंतर मुलाने  पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी  धाव घेतली. जयंत यांनी आत्महत्या नेमकी का केली हे समजू शकलेले नाही. पण नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. जयंत राजपूत यांच्या पत्नी नीता परदेशी यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपदही नीता परदेशी यांनी भूषविले होते

आपली प्रतिक्रिया द्या