जहांगीर कलादालनात आशिष कुमार दास यांचे प्रदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध शिल्पकार आशिष कुमार दास यांच्या ब्रॉन्झमधील शिल्पांचे प्रदर्शन काळाघोडा येथील जहांगीर कलादालनात 11 ते 17 ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात रसिकांना अनोख्या, कलात्मक तसेच मानवी भावभावनांचे पैलू असलेल्या कलाकृती बघता येतील.

आशिष कुमार दास मूळचे पश्मिच बंगालमधील  कलाकार. देशभरात त्यांची सोलो प्रदर्शने झालेली आहेत. त्यांचे बालपण लहान गावात गेल्यामुळे तेथील निसर्गसान्निध्यातील शांत व रम्य वातावरण, लोक, त्यांची साधी राहणी व जीवनशैली, संस्कृतीमूल्ये, परंपरा व रूढी यांचा पगडा त्यांच्या मनावर आहे. तसेच पुढील आयुष्यात त्यांचे वास्तव्य कोलकाता, नवी दिल्ली, मुंबई, वडोदरा वगैरेंसारख्या शहरात झाल्यामुळे एपंदर त्यांच्या कलात्मक शैलीवर त्या प्रकारच्या राहणीमानाचे व संस्कृतीचे परिणाम झाले व त्यांचे रम्य दर्शन त्यांनी आपल्या कलारूपांतून घडवले आहे. प्रदर्शनात ‘द हार्मोनियस युनिटी’,‘लक्ष्यभेद’, ‘दशावतार’, ‘दि प्रेअँड दि प्रोटेक्टर’, ‘दि फेलीन प्रोव्हेस’, ‘दि इटर्नल बॉण्ड’, ‘बॅलन्स इन नेचर’ कलाकृती पहावयास मिळतील. प्रदर्शन  सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल.