फेसबुक हटवणार आक्षेपार्ह पोस्ट

सामना ऑनलाईन | मुंबई

फेसबुकवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता युजर्स मोठय़ा प्रमाणात फेक न्यूज आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करीत आहेत. अशा फेक पोस्टमुळे काही देशांमध्ये हिंसा घडल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने आता ‘त्या‘ पोस्ट हटवायला सुरुवात केली आहे. फेसबुकने आपले धोरण बदलायचे ठरवले आहे. जेणेकरुन खोटय़ा बातम्या जास्तीत जास्त युजर्स पर्यंत पोचणार नाहीत. तसेच खोटय़ा बातम्या नेमक्या कोणत्या आहेत, हे ओळखण्यासाठी स्थानिक संस्थांचीही मदत घ्यायचे ठरवले आहे. अलीकडेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेक न्यूज हटवता येणार नाही, असे म्हटले होते. मात्र आता एखादी पोस्ट फेक न्यूजसारखी दिसत असेल तर न्यूज फीडमध्ये तिला खाली टाकले जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या