पाब्लो नेरुदा यांचा मृत्यू विषप्रयोगाने ! 50 वर्षांनंतर शास्त्रज्ञांचा अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोबेल पारितोषिक विजेते आणि प्रसिद्ध कवी पाब्लो नेरुदा यांचा मृत्यू कर्करोगाने नव्हे तर विषप्रयोगाने झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पाब्लो नेरुदांच्या मृत्यूनंतर 50 वर्षांनंतर आता आंतरराष्ट्रीय न्यायवैद्यक तज्ञांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

1973 मध्ये निधन झाले तेव्हा त्याचे कारण कर्करोग असल्याचे सांगण्यात आले होते. मृत्यूच्या चौकशीसाठी 2013 मध्ये त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. कॅनडा, डेन्मार्क आणि चिली या तीन देशांतील फॉरेन्सिक तज्ञांनी  बुधवारी सांगितले की, पाब्लो नेरुदा यांच्या शरीरात विषारी बॅक्टेरिया आढळून आले. जे नैसर्गिकरीत्या कोणत्याही शरीरात अस्तित्वात नसतात. नेरुदांचा मृत्यू कर्करोगाने नव्हे, तर विषप्रयोगाने झाला. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तज्ञांनी जवळपास 10 वर्षे तपास केला.