कांद्याला बाजारभाव नसल्याचे शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । कळवण

मागील वर्षी कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे आर्थिक संकट ओढवले, परंतु यंदा उत्पन्न चांगले, पण बाजारभाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कळवण तालुक्यातील नवीबेज येथील शेतकरी प्रशांत नानाजी खैरनार (38) याने टोकाचे पाऊल उचलले. नवीबेज येथे राहत्या घरात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुली आहेत.

प्रशांत खैरनार यांचे मागील वर्षी कांदा व टोमॅटोला बाजारभाव नसल्याने आर्थिक नुकसान झाले होते. यंदा कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा होती. सातत्याने कांद्याला कमी भाव मिळत असल्याने बाजारभावामुळे ते अस्वस्थ होते. शिवाय पतसंस्था, हातउसनवारीचे पैसे, थकलेल्या कर्जामुळे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते.