बोगस बियाणांमुळे शेतकऱ्याला दोन लाखांचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जिंतूर

तालुक्यातील पांगरी या गावातील शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतीत भेंडी या पिकाची लागवड केली होती. मात्र, तीन महिने उलटूनही भेंडीच्या रोपाला भेंडी लागली नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले. याविरोधात शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जिंतूर तालुक्यातील पांगरी येथील सुदाम सूर्यभान देवकर यांनी एप्रिल महिन्यात जिंतूर शहरातील श्रेयस कृषी केंद्र येथून भेंडीच्या वाणाची 250 ग्रॅमची पाकिटे 2100 रूपयात खरेदी केली होती. त्या वाणाची त्यांनी शेतात लागवड केली. या पिकासाठी त्यांच्या परिवराने मेहनत घेतली आणि या कष्टाचे फळ मिळेल या आशेने हे कुटुंब मेहनत करत होते. तीन महिन्यात झाडाची नियमीत नैसर्गिक वाढ झाली. मात्र, झाडाला भेंडीच आली नाही. शेतकऱ्याने संबंधित कंपनी व दुकानदारांना याबाबत सांगितले. संबंधित कंपनी व दुकानदारांनी शेतकऱ्याला विविध उपाय सूचवले. ते शेतकऱ्याने केल्य़ानंतरही भेंडीचे पीक आले नाही. त्यामुळे सूदाम देवकर यांनी 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी परभणी, जिंतूर, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार जिंतूर, पोलीस ठाणे जिंतूर आदींना तक्रार दिली आहे. त्या कंपनीने भेंडीच्या वाणाचे बोगस बियाणे श्रेयश कृषी केंद्र, येलदरी रोड, जिंतूर या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पंचनामा केला असून शतकऱ्याला न्याय मिळेल असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.