कर्जबाजारीपणामुळे कवडगावात तरुण शेतक-याची अत्महत्या

8

सामना प्रतिनिधी । वडवणी

महाराष्ट्र ग्रामीण बँक, सेवा सहकारी सोसीयटीचे व इतर सर्व मिळुन जवळपास दोन लाख रूपये कर्ज केवळ दोन एकर कोरडवाहु शेतीवर कसे फेडायचे या विवंचनेत असणा-या कवडगावातील एका 40 वर्षीय शेतक-याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन अत्महत्या केली. मंगलदास काळे असे शेतकऱ्याचे नाव आहे. वडवणी पोलीसांनी घटनास्थाळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह वडवणीच्या प्राथमीक आरोग्य केंद्राच दाखल केला.