Video – फास्ट अँड फ्युरियस 9 चा दुसरा ट्रेलर रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘फास्ट ऍण्ड फ्युरियस’ या सीरिजचे आतापर्यंत आलेले सर्व भाग सुपरहिट ठरले आहेत. या चित्रपटाच्या चेनचा नववा भाग हा मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्याचा दुसरा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्येही आधीच्या सर्व सिझनप्रमाणेच फुलऑन पॉवर पॅक्ड अॅक्शन पाहयला मिळणार आहे.

विन डिझेल व जॉन सिना यांची मुख्य भूमिका असलेला या चित्रपटाचा पहिला ट्रेलर गेल्या वर्षी रिलीज झाला होता. मात्र कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकललेले. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शनही पुढे गेले. नुकताच या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. पहिल्या ट्रेलरमध्ये जॉन सिना व विन डिझेल हे भाऊ दाखवले असून त्यांच्यात वैर असल्याचे दाखवलेले. आता या दुसऱ्या ट्रेलरमध्ये त्या दोघांमधील जबरदस्त अॅक्शन सिन दाखवण्यात आले आहेत.

दरम्यान प्रादेशिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हा चित्रपट हिंदी, तामीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती, भोजपुरी, पंजाबी आणि बंगाली या दहा भाषांमध्ये रिलीज होणार असल्याचे समजते.

पाहा ट्रेलर –