लुटालुटीचे प्रकार सुरूच; नागरिकांमध्ये खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. आता चोरट्यांनी एक प्रकारे नागरिकांवर दहशतीचे वातावरण निर्माण केले असून नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. सोमवारी भर दुपारी सव्वातीनच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी एका नोकरदाराचे ४ लाख रुपये लुटले आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीने शहरात खळबळ उडाली असुन या लूट प्रकरणी तोफखाना पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील टाकळी खातगाव येथील पोपट धोंडिबा कुलट (५६) हे कामानिमित्त नगर शहरात आले होते. शहरातील राज चेंबर ते एसटी महामंडळाच्या वर्कशॉपदरम्यान, कुलट हे दुचाकीवरुन जात असताना त्यांना फोन आला, दुचाकीवर रस्त्याच्या बाजूला फोनवर बोलत असताना पाठीमागून दोन जण दुचाकीवरुन आले. ते दोघेही कुलट यांची दिशाभूल करण्यासाठी म्हणाले की, तुमचे पैसे पडले आहे, त्यांचे ऐकुण कुलट यांनी मागे वळून पाहिजे असता त्या दोघा भामट्यांनी दुचाकीच्या हॅण्डलला लावलेली चार लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी पळवून नेली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कुलट यांनी तोफखाना पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढीत तपास पोलिस करत आहे.