
फिफा विश्वचषकाच्या सलमीच्याच सामन्यात यजमान कतारचा इक्वाडोरकडून दारुण पराभव झाला . पहिल्याच सामन्यात आफ्रिकन संघाने कतारवर 2-0 असा दणदणीत विजय मिळवला. इक्वाडोरचा कर्णधार व्हॅलेन्सीया या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने संघासाठी 2 गोल नोंदवले.
इक्वाडोरच्या संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली होती, पण सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. एकामागून एक इक्वाडोरियन आक्रमणे कटरच्या गोलवर होत होती. पण ही आक्रमणे कतारचे बचावपटू थोपवत होते. मात्र सामन्याच्या 15 व्या मिनिटानंतर चित्र बदलले. लढतीच्या 16 व्या मिनिटाला इक्वाडोरला गोल करण्याची सुवर्णसंधी चालून आली. कारण त्यांना यावेळी पेनल्टी मिळाली आणि या पेनल्टीवर इक्वाडोरच्या एनर व्हॅलेनसियाने आपल्या संघासाठी पहिला गोल केला. हा या विश्वचषकातील पहिला गोल ठरला.
पहिला गोल झाल्यावर इक्वाडोरच्या संघाने कतारच्या खेळाडूंना काही काळ बचावाच्या खेळात गुंतवून ठेवले आणि त्यानंतर त्यांनी एक मोठी चाल खेळली. कतारचा संघ आक्रमणासाठी आतूर असताना इक्वाडोरच्या संघाने आक्रमणाला अधिक धार आणली आणि त्यांना दुसरा गोल करण्यात यावेळी यश मिळाले. पुन्हा एकदा व्हॅलेनसियाने इक्वेडोरच्या संघाने कतारच्या खेळाडूंना काही काळ आपल्या खेळात गुंतवून ठेवले आणि त्यानंतर त्यांनी एक मोठी चाल खेळली. कतारचा संघ आक्रमणासाठी आतूर असताना इक्वाडोरच्या संघाने आक्रमणाला अधिक धार आणली आणि त्यांना दुसरा गोल करण्यात यावेळी यश मिळाले. पुन्हा एकदा 41व्या मिनिटाला व्हॅलेनसियाने इक्वाडोरला यश मिळवून दिले. व्हॅलेनसियाचा हा या सामन्यातील दुसरा गोल ठरला.
























































