FIFA विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंना मिळणाऱ्या कप आणि गिफ्ट बॉक्सचे उत्तरप्रदेश कनेक्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2022च्या FIFA विश्वचषक स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात सुरू झाली आहे. फिफा विश्वचषकात हिंदुस्थानी संघ खेळात नसला तरी या विश्वचषकाचा संबंध थेट उत्तर प्रदेशशी जोडला गेला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सामना विजेत्या संघाला देण्यात येणारी ट्रॉफी देण्यासाठी आणि त्या संघाला तसेच उपविजेत्या संघासह इतर खेळाडूंना देण्यात येणारी ट्रॉफी आणि त्याचा बॉक्स आग्रा येथे तयार करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील आग्र्याच्या हस्तकला कारागिरीला आणि मोज़ेक-कोरीव कामाला जगातील अनेक देशांमध्ये मोठी मागणी आहे. हिंदुस्थानसह इतर अनेक देशांमध्ये याची बरीच चर्चा आहे. विशेषत: आग्रा येथील ताजमहालचे सौंदर्य वाढवण्यात या कलेचा फार मोठा वाटा असल्याचे बोलले जाते. म्हणूनच हे मोज़ेक-कोरीवकाम परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते.

आग्रा येथील तरुण व्यावसायिक अदनान शेख सांगतात की, त्यांच्या कुटुंबातील अनेक कुटुंबे अनेक पिढ्यांपासून हस्तकला व्यवसायात आणि विशेषत: मोज़ेक-कोरीवकाम या व्यवसाय करत आहेत. काळाच्या ओघात आम्ही ही कला अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या आधुनिक युगात ही अनेक दशके जुनी कला तिच्या जुन्या सौंदर्यासह देश-विदेशात नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच फिफा विश्वचषक २०२२ साठी खास टॉफी आणि त्याचा बॉक्स बनवण्याचे काम आम्हाला देण्यात आले आहे.

FIFA विश्वचषकाची ट्रॉफी बनवताना मौल्यवान हिरे आणि सोन्याचे काम केले गेले आहे. कप तयार करण्यासाठी लॅपिस लाझुली या मौल्यवान दगडाचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच त्यावर २४ कॅरेट सोन्याची प्लेटिंग करण्यात आली आहे. या गिफ्ट बॉक्सचे वजन सुमारे 22 किलो आहे. हा बॉक्स बनवण्यासाठी जवळपास दोन महिने लागले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.