
तो बदली खेळाडू म्हणून आला आणि संघाला सामना जिंकवून गेला. ही गोष्ट आहे दक्षिण कोरियाच्या ओ ह्यून-ग्यू याची. त्याला वाँग इन बॉमची चांगली साथ मिळाली. वाँगच्या नेत्रदीपक खेळाच्या जोरावर दक्षिण कोरियाला चेकियावर 2-1 असा दमदार विजय मिळवता आला. बॉमने एक गोल केला आणि एक असिस्टही दिला. या खेळाडूने शेवटच्या अर्ध्या तासात खेळाचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. या विजयासह त्यांनी तीन गुणांची कमाई केली आहे.
चेकियाने या सामन्यात पहिला गोल केला, पण त्यांना ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. दक्षिण कोरिया आक्रमण तर करतच होता, पण ते करत असताना त्यांचा बचाव मात्र चेकिया खेळाडूंनी भेदला. यामध्ये चेकियाचा कर्णधार लाडिस्लाव्ह क्रेझकी हा आघाडीवर होता. कोरियाच्या गोलपोस्टच्या जवळ त्याने सातत्याने हल्ला चढवला. अखेर सामन्याच्या 59 व्या मिनिटाला त्याला यश मिळाले. त्यामुळे चेकियाला आघाडी मिळवता आली. पण त्यांना ही आघाडी 10 मिनिटेही टिकवता आली नाही.
वाँगने सामन्याच्या 69 व्या मिनिटाला गोल केला आणि सामन्यात चेकियाशी 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे चेकियाची आघाडी केवळ आठ मिनिटेच टिकली. त्यानंतर दोन्ही संघांकडून आक्रमण आणि बचाव अशी दुहेरी लढाई सुरू झाली होती. पण अखेर यामध्ये बाजी मारली ती कोरियाने. बदली खेळाडू म्हणून आलेल्या ओ ह्यून-ग्यू याने 80 व्या मिनिटाला निर्णायक गोल केला आणि संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. चेकियाने शेवटच्या क्षणांमध्ये बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, परंतु दक्षिण कोरियाने खंबीरपणे बचाव करत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली.
तोमास सोसेकचा गोल रेफ्रीनी अवैध ठरवला
77 व्या मिनिटाला चेकियाला मिळालेल्या फ्री-किकवर तोमास सोसेकने हेडरद्वारे गोल केला, पण नशिबाने साथ सोडली. खेळाडूंनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. सहाय्यक रेफ्रीनी ऑफसाईडचा झेंडा दाखवला आणि तो गोल रद्द करण्यात आला. अवघ्या तीन मिनिटांनंतर दक्षिण कोरियाने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.
कोरियाने केली गुणांची बोहनी
कोरियाने या विजयासह गुणांची बोहनी केली आहे. विजयामुळे त्यांना दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे अजून एक सामना जिंकून त्यांना बाद फेरीच्या दिशेने कूच करता येऊ शकते.






























































