
सामना ऑनलाईन ,सेंट पीटर्सबर्ग
क्रोएशियाने ‘आफ्रिकी पॉवर हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नायजेरियावर २-० गोलफरकाने दिमाखदार विजय मिळवून फिफा वर्ल्डकपच्या ‘ड’ गटात विजयी सलामी दिली. कर्णधार लुका मॉड्रिचने पेनल्टी किकवर केलेला गोल आणि नायजेरियाकडून झालेला स्वयंगोल ही क्रोएशियाच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली.
लढतीच्या ३१व्या मिनिटांपर्यंत उभय संघांना गोल करण्यात यश आले नाही, मात्र ३२ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मोंजुकिच ने हेडरने गोल करण्याचा प्रयत्न केला. नायजेरियाचा मिडफिल्डर क ‘सर्कोत्तम पासेस देणारा’ खेळाडू अशी ख्याती असलेल्या ओघेनेकारो एटेबोने हा गोल अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या पायाला लागून चेंडू नायजेरियाचा गोलकिपर ओझोहो याला काही कळण्याआधीच गोलजाळीत स्थिराकल्याने स्वयंगोल होऊन क्रोएशियाचे खाते उघडण्यात हातभार लागला. पिछाडीवर पडल्यानंतर नायजेरियाने अनेक धोकादायक चाली रचून क्रोएशियाच्या गोलपोस्टवर अनेक हल्ले केले, मात्र क्रोएशियाचा गोलरक्षक डॅनिजेल सुबासिकने गोलपोस्टपुढे डोळय़ांत तेल घालून पहारा देत नायजेरियाचे मनसुबे उधळून लावले. त्यानंतर ७०क्या मिनिटाला नायजेरियाच्या विलियम एकॉगने प्रतिस्पर्धी खेळाडूला डीमध्ये अडथळा आणून खाली पाडल्याने रेफ्रींनी पेनल्टी बहाल केली होती. त्याकर पाचव्यांदा किश्कचषक खेळत असलेल्या लुका मॉड्रिचने गोलजाळीचा केध घेत किश्कचषकात पहिला गोल नोंदकिला. ही आघाडी टिकवित क्रमवारीत ४८ व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाने २०व्या स्थानी असलेल्या नायजेरियाला २-० ने धूळ चारली.
क्रोएशियाने १९९८ साली फ्रान्समधील वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. त्यांनी उपांत्यपूर्क सामन्यात जर्मनीला धूळ चारली होती. योगायोग म्हणजे त्या वर्ल्डकपमध्येही क्रोएशियाने सलामीच्या लढतीत मेक्सिकोला १-० ने हरवले होते. यंदा नायजेरियाला क्रोएशियाची बचाव फळी भेदण्यात अपयश आले.

























































