व्हिडीओ-लाईव्ह वृत्तांकन करणाऱ्या महिलेचा फुटबॉलप्रेमीने केला विनयभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मॉस्को

पत्रकाराचं जीवन अत्यंत कठीण असतं, खासकरून महिलांसाठी. याचा प्रत्यय फीफा फुटबॉल वर्ल्डकपचे वृत्तांकन करणाऱ्या एका महिलेसोबत घडलेल्या प्रसंगावरून पुन्हा एकदा आला आहे.  जुलिश गोंझालेझ नावाची डॉईश वेले या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेची पत्रकार फीफा फुटबॉल वर्ल्ड कपचे लाईव्ह वृत्तांकन करीत होती. यावेळी एका प्रेक्षकाने तिच्या स्तनावर हात मारला आणि गालावर चुंबन घेत पळून गेला. वृत्तांकन सुरू असून ही पत्रकार बोलत असल्याने तिला त्यावेळी काहीच करता आलं नाही. तिने या घटनेता व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून असे प्रकार रोखण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.