
सामना प्रतिनिधी । जालना
जालना तालुक्यातील मौजे गोंदेगाव येथील शेतकरी करुन आश्रुबा बोर्डे (५०) या शेतकऱ्यानी २४ मे रोजी दुपारी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. कचरु आश्रुबा बोर्डे यांना गोंदेगाव शिवारामध्ये १ एकर २५ गुंठेच जमीन असून पत्नी, ३ मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार असून तिनही मुले शिक्षण घेत आहे.
शेतकरी कचरु बोर्डे यांच्यावर सर्वस्वी जबाबदारी त्यांच्या वरच अवलंबून आहे. निसर्गाने साथ न दिल्याने गेल्या तीन-चार वर्षांपासून जमीनीत अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. शिवाय वाढत्या महागाईमुळे व मुलाचा शिक्षणाचा खर्च व कुटूंबाचा खर्च कसा करावा असा प्रश्न कचरुला पडलेला होता. त्यातच मुलीच्या लग्नाचा प्रश्न त्यांच्यावर पडलेला होता. शिवाय एस.बी.आय. बँक, शाखा शिवाजी पुतळाचे त्यांच्यावर ३३ हजार रुपयांचे कर्ज असून त्यांनी कर्ज माफीचा फायदा मिळाला नाही. शिवाय चालू वर्षांत कापूस पिकाचे बोंड अळीमुळे पिक आले नाही. आता खर्च कसा भागवायचा या तणावाखाली ते अनेक दिवसांपासून चिंतेत होते. या आर्थिक विंवेचनेतून त्यांनी विष प्राशन करुन आपली जीवन यात्रा संपवली. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. याचा विचार करुन राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांस एक लक्ष रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी लंकाबाई कचरु बोर्डे यांच्याकडे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी तहसिलदार सुधाळकर, बाबासाहेब बोर्डे, सिध्दार्थ कचरु बोर्डे, संजय वाघ, शाहू खंदारे, शिवाजी वाघ, उत्तम वाघ, अनिरुध्द वाघ, प्रभाकर गितेकर, भाऊसाहेब वाघ, मनोहर वाघ, बाबासाहेब वाघ, ब्रम्हा वाघ, अशोक वाघ, रामेश्वर तिडके, कडुबा इंदलकर, कडूबा बोर्डे, गंगाराम बोर्डे, शेख फकीरा, प्रभाकर घडलिंग, मंडळ अधिकारी, तलाठी आदींची उपस्थिती होती.

























































