विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांना दणका, एक कोटी 18 लाख 67 हजारांची दंडवसुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहरात विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांची मोठी समस्या निर्माण झाल्याने त्याची वाहतूक पोलिसांनी आता गंभीर दखल घेतली आहे. विरुद्ध दिशेने वाहने चालवून नको त्या घटनांना खतपाणी घालणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी एक कोटी 18 लाख 67 हजार 850 रुपयांची दंडवसुली केली.

पोलिसांनी ठिकठिकाणी विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱयांविरोधात सापळा लावला आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाया सुरू केल्या आहेत. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांविरोधात जवळपास 34 हजार 677 चलानची कारवाई करण्यात आली, तर दोन हजार 616 हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली. आयपीसी कलमांतर्गत एकूण 404 प्रकरणे नोंदविण्यात आली असून सुमारे एक कोटी 18 लाख 67 हजार 850 रुपये दंड वसूल करण्यात आला. तीन हजार 982 परवाने निलंबनासाठी तर 461 वाहने जप्त करण्यात आली आहेत.