
सामना प्रतिनिधी । कोपरगांव
तालुक्यातील खिर्डीगणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला चांदर यांचे पती सोपान दगुजी चांदर व ग्रामसेवक यांनी शासनाची दिशाभुल करण्यांसाठी खोटे पुरावे दाखल केले तसेच सोपान चांदर यांनी खिर्डीगणेश परिसरातील म्हसोबा रोहम बंधारा, गारदा नदी आदी ठिकाणाहुन बेकायदा विनापरवाना ६७५ ब्रास वाळुमिश्रीत मुरूमाचा उपसा केल्याबददल उपजिल्हाधिकारी तथा कोपरगांवचे तत्कालीन तहसिलदार प्रशांत खेडेकर यांनी १८ लाख ३७ हजार ५०० रूपयांचा दंड ठोठावला आहे.
सोपान दगुजी चांदर यांनी दाखल केलेले आरटीएस अपिल फेटाळण्यांत आले आहे.































































