लॉकडाऊनचे उल्लंघन करून बाहेर फिरणार्‍या 50 जणांविरुध्द गुन्हा

800

कोरोना प्रादूर्भावाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाऊन तथा संचारबंदीमध्ये संभाजीनगर शहरात गेले 24 तासात विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या 50 जणांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीत व जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीपुरतेच घराबाहेर पडण्याची मूभा दिलेली आहे त्याचा फायदा उचलत घरात बसून कंटाळलेले काही लोक विनाकारण रस्त्यावरून फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. विचारपूस केल्यानंतर ते खोटे बोलत असल्याचेही आढळून आल्याने पोलिसांनी आधी फटके देऊनही सुधारत नसल्याचे पाहून त्यांच्याविरुध्द हे गुन्हे दाखल केले आहेत.

शहरातील क्रांती चौक, मुकुंदवाडी, सिडको, गुरुगोविंदसिंगपुरा एमआयडीसी वाळूज, वाळूज अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनाकारण घराबाहेर येऊन रस्त्यावर फिरणार्‍या 50 जणांच्या विरोधात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या