बोरिवलीमध्ये इमारतीत आग; एका महिलेचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना आॅनलाईन । मुंबई

बोरिवलीत शिंपोली रोड येथील एका इमारतीत लागलेल्या आगीत एका महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. बोरिवली पश्चिमेकडील रिलायन्स मॉलच्या जवळ असलेल्या धर्मक्षेत्र इमारतीत संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने ही आग पंधरा मिनिटांत विझवली. या आगीत दोन महिला जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र जया रमेश घसारिया ही 55 वर्षांची महिला मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या महिलेच्या अंगावर जळल्याच्या खुणा अजिबात नव्हत्या. धुरामुळे संपूर्ण शरीर काळे पडले होते. तर दुसरी महिला लक्ष्मी यारोला यांची प्रकृती स्थिर आहे.