नगरमधील पाच धरणे 90 टक्के भरली

राज्यात सुरू असणाऱ्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. नगर जिह्यातील धरणांमध्येही पाण्याची आवक वाढत असून, जिह्यातील जवळपास 5 धरणे 90 टक्क्यांवर पोहोचली आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला. यानंतर पावसाचा जोर ओसरला. जवळपास आठ ते नऊ दिवस पावसाने उघडीप दिली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आले; पण आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. 15 ऑगस्टपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. 17 ऑगस्टला राज्यातील बहुतांशी जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसाचा शेती पिकांना फटका बसला आहे. या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. नगर जिह्यातील धरणांमध्येही पाण्याची आवक वाढत असून, जिह्यातील पाच धरणे 90 टक्क्यांवर पोहचली आहेत.