LIVE- पुन्हा तारीख…राम मंदिराप्रकरणासाठी नवं घटनात्मक पीठ 29 जानेवारीला गठीत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

  • लळित यांनी कल्याणसिंह यांच्यासाठी 1994 साली या प्रकरणात वकिली केली होती
  • घटनापीठाचे सदस्य न्यायमूर्ती उदय लळित यांच्याबाबत वकील राजीव धवन यांनी एक आक्षेप नोंदवला होता
  • या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी गठीत केलेल्या घटनात्मक पीठाऐवजी नवं घटनापीठ गठीत केलं जाणार
  • घटनात्मक पीठ बनविणे हा सरन्यायाधीशांचा अधिकार आहे, राजीव धवन याच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे स्पष्टीकरण
  • राजीव धवन यांनी उपस्थित केलेल्या मुद्दानंतर न्यायमूर्ती लळित यांनी खटल्यापासून स्वत:ला वेगळं करण्याची भूमिका मांडली
  • घटनात्मक पीठाच्या गठणासंदर्भात न्यायालयीन आदेश जारी केला जावा-राजीव धवन
  • राजीव धवन यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित केला
  • न्यायमूर्ती लळित यांच्याबद्दल उपस्थित केलेल्या मुद्दाबाबत घटनात्मक पीठातील सदस्यांमध्ये चर्चा
  • ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी त्यावेळचे प्रकरण हे गुन्हेगारी स्वरूपाचे होते, आणि आजचे प्रकरण वेगळे आहे असा युक्तिवाद केला.
  • न्यायमूर्ती लळित हे पाच सदस्यीय घटनात्मक पीठाचे सदस्य आहेत
  • वकील राजीव धवन यांनी उपस्थित केला मुद्दा
  • न्यायमूर्ती उदय लळित हे 1994 साली कल्याणसिंह यांचे वकील होते
  • प्रकरण केव्हापर्यंत निकाली काढायचं हे आज ठरणार, आज निकाल येणार नाही
  • 1 नंबर कोर्टाबाहेर युक्तिवाद ऐकण्यासाठी जबरदस्त गर्दी
  • न्यायालयासमोर ‘बाबरनामा’ देखील सादर केला जाणार, बाबराने राम मंदिर तोडून तिथे मशिद बांधल्याचा बाबरनामामध्ये उल्लेख असल्याचं वकिलांचं म्हणणं आहे
  • सर्वोच्च न्यायालय परिसरात अभूतपूर्व बंदोबस्त
  • दोन्ही पक्षांचे वकील सर्वोच्च न्यायालयात पोहोचले
  • सकाळी 10.30 पासून सुनावणीला सुरुवात होणार
  • पीठामध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन.व्ही. रमण्णा, न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा समावेश
  • सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनात्मक पीठ सुनावणी करणार
  • 5 न्यायमूर्तींचे खंडपीठ सुनावणी करणार
  • राम मंदिराबाबतच्या याचिकांवर सुनावणी