
ओडिशातील एका सरकारी रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून पाच तृतीयपंथीयांची नेमणूक केली आहे. सर्व कर्मचार्यांना मासिक पगार आणि इतर सुविधाही प्रशासन देणार आहेत.
दुर्गा, सोनाली, तुषार, कैलास आणि हियाल असे नियुक्त झालेल्या तृतीयपंथीयांचे नावे असून मलकागिरी जिल्हा इस्पितळात त्यांना नोकरी मिळाली आहे.. ओडिशा सरकारने निर्मला योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने या तृतीयपंथीयांना रोजगार दिला आहे. सर्व उमेदवारांना 15 दिवस प्रशिक्षण देण्यात आले. सर्व उमेदवार इस्पितळात आठ तास थांबून रुग्णांची काळजी घेत होते. त्यांना मासिक सहा ते सात हजार रुपयांचा पगार देण्यात येणार आहे. कर्मचार्यांना मिळणार्या विम्यासह सर्व सुविधाही त्यांना मिळणार आहेत. सर्व तृतीयपंथी महिला विभाग, बाल विभाग आणि गायनकालॉजी विभागाबाहेर पहारा देतील.
























































